संत सेवालाल महाराज सामाजिक मंडळ नवीन कार्यकारिणी सर्वानुमते स्थापना*
आंबिवली विभागीय संपादक कृष्णा पवार
दि. २७/९/२०२६ रोजी लहुजी नगर येथील संत सेवालाल मंदिर परिसरात संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा मंडळ आंबिवली यांच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते स्थापना करण्यात आली, विद्यमान अंबादास पंडित राठोड यांनी सामाजिक कार्यास अधिक या चार वर्षांत गती दिली आहे.व निस्वार्थीपणे सेवा करण्यासाठी आपल्या पदाचा सहखुशीने अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन निष्ठावंत व समाजसेवक खरे,अंबादास पंडित राठोड, यांनी ईश्वर विश्वास राठोड यांच्याकडे अध्यक्ष- पदांचा कार्यभार स्वेच्छेने सोपविला.
यावेळी गुलालाची उधळण व पुष्पहार घालून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव,महिला व युवक उपस्थित होते अंबादास यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,समाजसेवा हेच खरे ध्येय असून नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मंडळ सामाजिक कार्यात अधिक भरीव कामगिरी करेल असा मला विश्वास आहे.
नविन नायक, कारभारी, अध्यक्ष ईश्वर राठोड यांनी बोलताना सांगितले की,"संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा व आदर्शाचा वारस पुढे नेण्याचे गोरगरीब, वंचित समाजासाठी,शिक्षण, आरोग्य व सामाजिक सेवा उपक्रम राबविण्यात येथील. सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.
अशे अश्वासन समाज बांधवाना दिले.

