. प्रमुख रस्त्यावरून अंत्ययात्रा देखील जाऊ देत नाहीत एवढी तुमची दादागिरी वाढली का.? भाजपाने ते किरीट सोमय्या यांचा किनगाव भेटीदरम्यान समाज कंटकांना कडक इशारा
यावल दि.१७( सुरेश पाटील)
अंत्ययात्राही जाऊ देत नाही, एवढी दादागिरी आता चालणार नाही, किरीट सोमय्या यांचा इशारा किनगावातील समाजकंटकांना.
मुख्य रस्त्यावरून अंत्ययात्रा देखील जाऊ दिली जात नसल्याचा प्रकार गंभीर असून ही दादागिरी आता सहन केली जाणार नाही असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दुपारी किनगाव भेटीदरम्यान दिला.किनगाव येथे मुख्य रस्त्यावरून अंत्ययात्रा व मिरवणुका जाऊ न देण्याच्या प्रकारावरून तणाव निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गावाला भेट देऊन प्रशासन व नागरिकांशी चर्चा केली.पोलिस बंदोबस्तात त्यांनी संबंधितांवर तिखट शब्दांत ताशेरे ओढले.
"अशा प्रकारची त्यांची दादागिरी आहे असं मला काल कोणीतरी सांगितलं होतं खरी... शिवजयंती पण साजरी करू दिली नाही."
नागरिक सांगतात - "हनुमान मंदिराच्या रस्त्यावरून पथसंचलन जाऊ देणार नाही असे सांगितले गेले."
तर तिथं रामाचं नाव पण घेता येत नव्हतं.हा मुख्य रस्ता आहे तर तुम्ही कशी काय परवानगी देत नाही.आणि तुम्ही कोण परवानगी न देणारे ? मला कळलं प्रेतयात्रा पण जाऊ शकत नाही. विरोध करण्याचं तुम्हाला अधिकार कोणी दिलेत ? तुम्ही कसं काय मिरवणूक थांबवू शकता ? परवानगी न देणे म्हणजे काय ?"अशा शब्दात खासदार किरीट सोमय्या यांनी किनगाव येथे वक्तव्य केलं आणि पत्रकारांना माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे आमदार अमोल जावळ
भाजपा जळगाव महानगरपालिका अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, विलास चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती,सभापती उज्जैनसिंग राजपूत,निर्मला पाटील यांचे सह स्वयंसेवक संघाचे शेकडो कार्यकर्ते आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.तर फैजपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर.यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे तहसीलदार मोहनमाला नाझरीकर.नायब तहसीलदार व महसूल विभागाचे कर्मचारी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

