बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा..माजी आमदार चंद्रशेखर घुले । शेवगाव बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा..

बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा..

माजी आमदार चंद्रशेखर घुले । शेवगाव बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा..


(अहिल्यानगर। प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)


बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारदर्शक व्यवहार, योग्य बाजारभाव, मूलभूत सुविधा तसेच शेतमाल विक्रीसाठी सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.

शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी घुले बोलत होते. सभेस शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे सभापती हनुमान पातकळ, बबनराव भुसारी, पंडित भोसले, वसंतराव लांडे गुरुजी, उपसभापती अशोक धस, कैलास नेमाने, सुधाकर लांडे, ताहेर पटेल, एजाज काझी आदी उपस्थित होते.

घुले म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि दर मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. बदलत्या कृषी क्षेत्राचा विचार करून भविष्यातील गरजांनुसार बाजार समितीच्या कामकाजात आवश्यक सुधारणा कराव्यात.

यंदा पावसाअभावी दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासह शेतीशी संबंधित अडचणींमधून दिलासा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे घुले यांनी सांगितले.

सभेदरम्यान बाजार समितीच्या वार्षिक कामकाजासह शेतकरी व व्यापाऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बाजार समितीच्या भविष्यातील विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत उपस्थितांनी सूचना मांडल्या. सभासदांच्या सूचना व अडचणींचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका संचालक मंडळाने घेतली.

यावेळी बाळासाहेब वडघणे, बाळासाहेब ढाकणे, अनिल मडके, प्रदीप काळे, नाना मडके, विजय देशमुख, अरुण घाडगे, जगदीश धूत, निलेश रोकडे, भारत मोटकर, सचिन फटांगरे, मिलिंद गायकवाड, दत्तात्रय फुंदे, संजय नांगरे, कैलास देहडराय यांच्यासह बाजार समितीचे संचालक मंडळ, तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अरुण ढाकणे संचालक, व्यापारी, हमाल, मापाडी, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि बाजार समितीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती हनुमान पातकळ यांनी केले. सूत्रसंचालन संजय कोळगे यांनी केले, तर सचिव मुद्दसर शेख यांनी आभार मानले
Previous Post Next Post