डॉ. बालाजी लघुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयातील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप.
डॉ. बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेण्याची काळाची गरज - डॉ. बालाजी लघुळकर.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील डॉ.बालाजी लघुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त,डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे वाचनालयातील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला, डॉ बालाजी लघुळकर यांनी आरोग्य विभागातील गेल्या वीस वर्षापासून सेवा करत, असून त्यांच्या सेवेत त्यांनी सामाजिक, व शैक्षणिक आरोग्य,कार्यात महत्त्वाची भूमिका निभवण्याचे कार्य करतात त्यांचं, बालपण व त्यांचं शिक्षण अत्यंत गरीब कुटुंबात झालेला,असून शिक्षणाची जाणीव काय असते व समाजामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे, परिश्रम करावे लागते, या गोष्टीची जाणीव ठेवून त्यांनी सतत सामाजिक कार्यात व शैक्षणिक बाबतीत अनेक कुटुंबाला आर्थिक मदत करत असतात, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केक कापून मोठा जल्लोष साजरा केला असता पण, त्यांनी अनर्थ खर्च न करता त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वही व पेन हिप्पारगा थडी येथील,डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे वाचनालयातील विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आले यावेळी उपस्थित मातंग समाजाचे समाज अध्यक्ष भगवान एडकेवार,व वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार,वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील अंजनीकर, वाचनालयाचे सचिव राजू भुमाजी अंजनीकर, वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी आंजनिकर, वाचनालयाचे सहसचिव दीपक एडकेवार, मारोती आबाजी एडकेवार, सुरेश एडकेवार भीमराव एडकेवार जकोजी एडकेवार मारिबा आंजनिकर, आबावबाई एडकेवार, अर्चना गुजलवाड, शेषाबाई बेलकर, शेषाबाई एडकेवार, अरुणा बेलकर, रेखा गायकवाड, व वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते. वाचनालयातील समितीतर्फे डॉ. बालाजी लघुळकर सरांना पुष्पहार देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा विद्यार्थी व समितीतर्फे देण्यात आले. यावेळी मातंग समाजातील समाज बांधव व उपस्थित गावकरी यांना मार्गदर्शन डॉ. बालाजी लघुळकर यांनी केले, शिका संघटित व्हा संघर्ष करा असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले त्यामुळे खूप कष्ट घेऊन विद्यार्थ्यांनी या वाचनालयातून घडावे, या वाचनालयांमध्ये कार्य करणाऱ्या सर्व अध्यक्ष सचिव ग्रंथपाल उपाध्यक्ष सर्व सदस्यांचे डॉ.लघुळकर यांच्याकडून स्वागत करण्यात आले यावेळी, सूत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार यांनी केले, व कार्यक्रमाचे संभारंभ वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर यांनी केले, व आभार प्रदर्शन वाचनालयाचे सहसचिव दीपक एडकेवार यांनी केले.

