*बंजारा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा*- योगेश पवार
बीड प्रतिनिधी
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जगदंबा गड तालुका धारूर जिल्हा बीड येथे 19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बंजारा मेळाव्यास जास्तीत जास्त बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी बंजारा ब्रिगेड आयोजित हा कार्यक्रम बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली होत असून महाराष्ट्रातील तमाम सर्व बंजारा बांधव तसेच महिला भगिनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पवार यांनी केले आहे

