गणेश भाऊ सपकाळे यांची भीम आर्मीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती; विविध जिल्ह्यांची प्रभारी जबाबदारी*

*गणेश भाऊ सपकाळे यांची भीम आर्मीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती; विविध जिल्ह्यांची प्रभारी जबाबदारी*

जळगाव : भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संस्थापक मा. भाई चंद्रशेखर आझाद व राष्ट्रीय प्रमुख मा. भाई विनय रतन सिंह यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली, तसेच राज्य प्रमुख मा. अशोकजी कांबळे यांच्या राज्यस्तरीय नेतृत्वात संघटनेचे कार्य सुरू आहे.
या संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे (भुरा भाऊ) यांच्यावर महत्त्वपूर्ण संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची प्रदेश महासचिव तसेच उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, नागपूर, बुलढाणा, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांची प्रभारी जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे, तसेच वंचित, शोषित आणि पीडित घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणे, या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
गणेश भाऊ सपकाळे यांच्या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्रासह संबंधित जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Previous Post Next Post