राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या ३४ साव्या नवरात्र उत्सवाचे आयोजन.
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या शांती चौक मित्र मंडळाच्या उ४ साव्या नवरात्र उत्सवाचे आयोजन मंडळातर्फे मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे सदर नवरात्र उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होणारा असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी शांती चौक मित्र मंडळाने नवरात्रीचे नऊ दिवस विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे .
रविवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वैष्णवी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व घटस्थापना होणार असून सायंकाळी मंडळातील सदस्य हे श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुर ते राहुरी फॅक्टरी भगवती मातेची ज्योत घेऊन येणार असून सदर भगवती मातेच्या ज्योतीचे स्वागत राहुरी फॅक्टरी परिसरातील भाविक भक्त करतील त्याचप्रमाणे दररोज सकाळी साडेआठ वाजता व संध्याकाळी सात वाजता देवीची आरती होईल .
त्यानंतर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून राहुरी फॅक्टरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री .दीपक भाऊ त्रिभुवन व मंडळांच्या सर्व सदस्यांनी केले आहे .

