*श्री सुहास काटे यांना नसर्गोपचार गौरव सन्मान....*

*श्री सुहास काटे यांना नसर्गोपचार गौरव सन्मान....* 

(जिल्हा विभागीय प्रतिनिधी  संतोष उपर्वट)

 अकोला..येथील सुप्रसिद्ध
 निसर्गोपचार तज्ञ श्री सुहास काटे यांना रविवार दि 4 ऑक्टोबर 2026 ला आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, 
ए जी एम ए व योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन मार्फत अतिशय प्रतिष्ठेचा निसर्गोपचार गौरव सन्मान 2026 मोठ्या थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भातृमंडळ हॉल बुलडाणा येथे देण्यात आला.
 निसर्गोपचारक यांच्या कार्याचा हा सन्मान आहे, 
 या सन्मानाला महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये बुलडाणा मतदार संघातील लोकप्रिय आमदार मा.श्री संजयभाऊ गायकवाड, बुलडाणा नगर पालिका नगराध्यक्षा सौ पूजाताई गायकवाड,, डॉ सचिन सुपे, डॉ त्रिदीप गुहा,डॉ प्रशांत कपाले,एम जी एम विद्यापीठाचे योगा विभाग प्रमुख श्री गंगाप्रसाद खरात,
  तर मंचावर प्रमुख उपस्थितीमध्ये 
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्री नितीनराजे पाटील,आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन 
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बाबुराव कानडे,
सौ दिशा चव्हाण,श्री विजय नवल पाटील,श्री विनोद ढोबळे,श्री रावसाहेब घोडेगाव,श्री रामेश्वर शिंदे,श्री.श्रीकांत अंजुटगी,श्री भानुदास परबत,श्री अशोक देवकर,संजय गवारे सौ स्मिता खारकर,श्री राहुल देशमुख,श्री आशिष सूर्यवंशी,
व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकलअसोसिएशन .पदाधिकारी उपस्थित होते. श्री सुहास काटे
 निसर्गोपचार तज्ञ यांना हा *निसर्गोपचार गौरव सन्मान 2026 मिळाल्या बद्दल* सर्व स्तरावरून श्री सुहास काटे यांचे कौतुक होत आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मीडिया पोलीस टाईम LIVE
अकोला जिल्हा विभागीय प्रतिनिधी ✍️

✍️संतोष उपरवट ✍️
Previous Post Next Post