शांती चौक मित्र मंडळात नवरात्र उत्सवा निमित्त वैष्णवी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व घटस्थापना मोठ्या उत्साहात पार पडली..

शांती चौक मित्र मंडळात नवरात्र उत्सवा निमित्त वैष्णवी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व घटस्थापना मोठ्या उत्साहात पार पडली..


(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )


राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या शांती चौक मित्र मंडळाच्या ३४ सव्या नवरात्र उत्सवात आज सकाळी दहा वाजता वैष्णवी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व घटस्थापना साई आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक /अध्यक्ष श्री .शिवाजीराव कपाळे व संगीता ताई कपाळे त्याचबरोबर शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री .दीपक त्रिभुवन व ज्योती त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आली .
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे सचिव सल्लागार प्रकाश शेठ सोनी उपाध्यक्ष हर्षद ताथेड कार्याध्यक्ष नितीन डंबाळे किशोर कोबरणे संदीप गायकवाड सर पत्रकार प्रविण पाळंदे रामेश्वर तोडमल आदींसह यावर्षीचे नवरात्र उत्सवाचे सर्व नियोजन करणारे शांती चौक मित्र मंडळाचे युवा सदस्य योगेश ( दादा ) जाधव मुन्ना अन्सारी महेश आधापुरे वृषभ संचेती वेदांत कपाळे भैय्या अन्सारी सुजित बडे यश (पप्पु) आदिक साई त्रिभुवन गौरव सोनवणे स्वप्निल (सोन्या ) आहेर मयूर सोनवणे मोहित ताथेड ज्ञानेश्वर शिंदे तन्मय आहेर साई आहेर ओम शिंदे मोहित चव्हाण तिर्थश भंडारी प्रणय भोसलेआदींसह मंडळाच्या युवा सदस्यांनी नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे .
शांती चौक मित्र मंडळातील युवा सदस्यांचे साई आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक /अध्यक्ष श्री .शिवाजीराव कपाळे यांनी कौतुक केले असून पुढील नवरात्र उत्सव यापेक्षाही भव्य दिव्य अशा पद्धतीने साजरा करण्यासाठी श्री .शिवाजीराव कपाळे यांनी मंडळातील युवा सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .
Previous Post Next Post