अहिल्यानगरचा भूमिपुत्र अस्लम इनामदार याचा पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार..
(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविलेल्या अहिल्यानगरचा भूमिपुत्र अस्लम इनामदार याची खेळातील कारकीर्द व सुवर्ण विजयी हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले .
अहिल्यानगर जिल्ह्यामधील असणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान चा भूमिपुत्र अस्लम इनामदार यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व करून सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकविण्याचा मान मिळविला आहे .
सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर क्रीडा क्षेत्रात अस्लम इनामदार आणि त्याच्या संघाने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे हे त्याची यशअहिल्या नगरच्या क्रीडा संस्कृतीचे त्याच्या कुटुंबीयांचे आणि प्रशिक्षकांचे आहे .ग्रामीण भागातील खेळाडू आपल्या मेहनतीने व जिद्दीने नावलौकिक मिळवत असल्याचे त्यांनी सांगून योग्य संधी प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाले तर खेळाडू देशाचे नाव उज्वल करू शकतो हा आत्मविश्वास असलम च्या यशाने सर्वांना दिला आहे असे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात नमूदद केले व पुढील स्पर्धेसाठी अस्लम ला शुभेच्छा दिल्या यावेळी अस्लमचक्रीडा प्रशिक्षक सह कौटुंबिक नातेवाईक मित्रपरिवार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

