कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला जय हिंदची मानवंदना.जय हिंद मंडळाचे प्रथम पारितोषिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला समर्पित..

कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला जय हिंदची मानवंदना.

जय हिंद मंडळाचे प्रथम पारितोषिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला समर्पित..


(अहिल्यानगर । प्रशांत बाफना विभागीय संपादक महाराष्ट्र राज्य)


शहरातील जय हिंद तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात सादर केलेल्या भगवान विष्णू दशावतार या भव्य आणि भक्तिमय जिवंत देखाव्याला विचार भारती उत्कृष्ट देखावा स्पर्धेतील पौराणिक जिवंत देखावा विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. मंडळाचे हे पारितोषिक शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वंशाचे शूर वैमानिक स्मित मच्छार यांना अर्पण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे, अशी माहिती जय हिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विपुल शेटीया यांनी दिली.

जय हिंद तरुण मंडळांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवात आकर्षक पौराणिक दशावतार हा भव्य जिवंत देखावा सादर केला होता. आकर्षक, कलात्मक मांडणी, उत्कृष्ट वेशभूषा, प्रकाशयोजना आणि कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे या देखाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विचार भारतीच्या परीक्षकांनी या देखाव्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले आहे. मंडळाच्या या यशामध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार, इव्हेंट मॅनेजमेंट टीम, साऊंड सिस्टीम तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अथक परिश्रम असल्याच्या भावना मंडळाचे उपाध्यक्ष बाली ठाकूर यांनी व्यक्त केली.

शेकडो प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या या भारतमातेच्या वीर सुपुत्राला आमच्या महाविजयाफची ही छोटीशी मानवंदना आहे. हे पारितोषिक आम्ही कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला आणि कर्तव्यनिष्ठेला समर्पित करीत आहोत, अशी भावना जय हिंद तरुण मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.या यशाबद्दल व सामाजिक जाणिवेचे जय हिंद तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कलाकार, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक विपुल शेटिया, उपाध्यक्ष बाली ठाकूर, खजिनदार पिटू राठोड, सचिव गणेश होनावळे तसेच प्रशांत मुथा, संजय चांदेकर, विशाल शेटिया, अमोल ठाकूर, राजेश चेंगोडिया, अथर्व चांदेकर, सुजीत साळुंके, फैजान सय्यद यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या यशासाठी परिश्रम घेतले
Previous Post Next Post