शहाद्याच्या विकासाला गती! नगरोत्थान महाअभियानातून ५ कोटी ३१ लाखांच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता: उपनगराध्यक्ष सौ. माधवी पाटील..

शहाद्याच्या विकासाला गती! नगरोत्थान महाअभियानातून ५ कोटी ३१ लाखांच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता: उपनगराध्यक्ष सौ. माधवी पाटील..


नंदुरबार जिल्हा विभागीय प्रतिनिधी 
प्रा. डी सी पाटील

शहादा : शहादा नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सर्वसाधारण योजना सन २०२६-२७ अंतर्गत शहरातील विविध विकासकामांसाठी एकूण ५ कोटी ३१ लाख ७७ हजार ३३ रुपये इतक्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
     नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी यासंदर्भातील प्रशासकीय मान्यता आदेश जारी केले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी दिली आहे.
     या योजनेअंतर्गत शहादा शहरातील विविध प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण, नूतनीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली आहेत.
मंजूर झालेली प्रमुख कामे अशी :
१. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्ता (भाग-१) - ९२,५९,९९६ रुपये
२. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्ता (भाग-२) - ९२,४३,५३१ रुपये
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते सिद्धार्थ नगरपर्यंत रस्ता - ७१,१२,३४९ रुपये
४. स्टेट बँक ते जुनी मोहिदा चौफुलीपर्यंत रस्ता (भाग-१) - ८६,१८,६७३ रुपये
५. सरवर मंडप ते आनंद बॅटरीपर्यंत रस्ता - ९४,६२,३९६ रुपये
६. भारत पेट्रोल पंप (जुनी एचडीएफसी बँक) ते नवा प्रकाश रोडपर्यंत रस्ता - ९४,८०,०८८ रुपये
     या सर्व कामांसाठी शासनाचा ८५ टक्के हिस्सा ४ कोटी ५२ लाख ०० हजार ४७९ रुपये असून, नगरपरिषदेचा १५ टक्के हिस्सा ७९ लाख ७६ हजार ५५५ रुपये असणार आहे.
     सदर कामांची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाचे सर्व नियम, अटी व शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे मुख्याधिकारी, शहादा नगरपरिषद यांना बंधनकारक राहणार आहे. कामाची गुणवत्ता राखत ही विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
     आमदार राजेश पाडवी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहरातील विविध भागांतील विकासकामांना मंजुरी मिळाली असून, यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणासह नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा मिळणार असल्याचे उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई पाटील यांनी सांगितले.
Previous Post Next Post