शेळगाव येथे इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश (पिंजारी महेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर ) देगलूर : तालुक्यातील शेळगाव नृसिंह येथे रमजानच्या पवित्र महिन्यातील हिंदू मुस्लिम एकता संदेश इफ्तार पार्टीने केवळ उपवास सोडण्याचा सोहळा नसून, तो सामाजिक सलोखा आणि प्रेमाचा संदेश देणारा सन आहे. पवित्र रमजान महिना मुस्लिम समाजाने उपवास धरून आल्हा ची पार्थना करतात यात रमजान एकतेचा उत्सव. आज मुस्लिम समाज आयोजित केलेल्या एकता पार्टीमध्ये सहभागी होण्याचे लाभ मिळाले, त्यानिमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांशी पवित्र रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेस पक्षाचे देगलुर तालुका अध्यक्ष विष्णुकांत पाटील, माधव पाटील शेळगावकर, राजू मामा चोडे , अर्जुन गुडफळे, खाजा भैय्या शेख, नसीर शेख, शार्दुल शेख, रामलु अरजलवार, मोहम्मद शेख, व तसेच सर्व मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आय इफ्तार पार्टीचे आयोजन माधव पाटील शेळगावकर यांनी केले.करून देगलूर तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज व हिंदू समाजाला ऐकतेच संदेश देण्यात आले,या वेळी शेळगाव येथील सर्व मुस्लिम समाज बांधव व गावकरी मोठया संख्येने उपस्थिती होते.

शेळगाव येथे इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश 
Previous Post Next Post