अतिक्रमण हटविण्याच्या मागणीवर ठाम अन्यथा आमरण उपोषण- भाजपचे उपाध्यक्ष जिल्हा मकरंद पाटील; प्रशासनाच्या टाईमपास भूमीकेकडे लक्ष... (प्रा. डी. सी. पाटील, नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक)शहादा : शहरातील अतिक्रमणांच्या वाढत्या प्रश्नावरुन प्रशासनाविरोधात भाजपाने आक्रमक, आग्रही ठाम भूमिका घेतली आहे. येत्या 20 मार्चपर्यंत अतिक्रमणे हटवावीत अन्यथा, दि.21 मार्चपासून नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात प्रा.पाटील यांनी शहादा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वाढत्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाच्या वेळकाढू धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून चालढकल करण्यासह ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शहरातील तीन प्रमुख ठिकाणांवरील अतिक्रमणांचा विशेष उल्लेख केला आहे. त्यानुसार मेमन जीन कंपाऊंड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांसह दोंडाईचा रस्त्यालगत केशरानंद मंगल कार्यालयाजवळील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून हा रस्ता तातडीने मोकळा करावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. याशिवाय शहराच्या मुख्य रस्त्यांवर लॉरीधारकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शहरातील अतिक्रमणांमुळे सामान्य नागरिक, व्यापारी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत प्रा. पाटील यांनी प्रशासनावर टीका केली. दि.20 मार्चपर्यंत कारवाई न झाल्यास 21 मार्चपासून नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रस्तावित आंदोलनात प्रा. मकरंद पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान शहादा पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले की, भाजपाने दिलेल्या पत्रानुसार शहरात 23 मार्चनंतर अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्याने पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, सणोत्सवांचा काळ असल्यान 23 मार्चनंतर पोलीस बंदोबस्त मिळणार असून याबाबतची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यांनी तोपर्यंत उपोषण थांबवावे.

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीवर ठाम अन्यथा आमरण उपोषण- भाजपचे उपाध्यक्ष जिल्हा मकरंद पाटील; प्रशासनाच्या टाईमपास भूमीकेकडे लक्ष...                          
Previous Post Next Post