शेवाळा येथे वीज केबिनमुळे नागरिकांना, धोका... (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) नांदेड : देगलूर तालुक्यातील शेवाळा महावितरण कडून गावातील अनेक रस्त्यांवर वीज केबिन उभारण्यात आले आहेत. याच केबिनमधून घराघरांमध्ये वीजपुरवठा केला जातो.सुरुवातीच्या काळात सुरक्षित वाटणारे हे केबिन आता धोकादायक बनले आहेत. मागील काही वर्षभरापासून या केबिनमध्ये दुसऱ्या विभागाला वीजपुरवठा करण्यासाठी चक्क बाहेरून थेट तारा केबिनमध्ये सोडल्या जात आहेत. यामुळे येथील स्थानिकांची सुरक्षिततात धोक्यात आल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.विजेच्या तारा या भूमिगत टाकल्या जातात. मात्र, गावातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या व येथील गल्लीबोळातील घरांमध्ये वाढलेला विजेचा पुरवठा यामुळे विज वितरण प्रशासनावर ताण पडत आहे. येथील वाढती विजेची मागणी पाहता अनेकदा वीज यंत्रणेवर ताण पडून शॉर्टसर्किटच्या घटना घडत आहेत. अशात एका ठिकाणचा वीजपुरवठा खडीत झाल्यानंतर चक्क दुसऱ्या विभागातील केबिनमधून वीजपुरवठा केला जातो. मात्र, असे करताना चक्क विजेच्या तारा या जमिनीत खड्डा खणून न करता, थेट बाहेरूनच केबिनमध्ये सोडल्या जात असल्याचा प्रकार येथे घडत आहे. महत्त्वाचे हा तात्पुरता प्रयोग असतो. मात्र, अनेकदा हे प्रकार कायमचे होऊन जातात.दरम्यान, या अशा प्रकारच्या उघड्यावरील वीज केबलमुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. या केबिन मुख्य रस्त्यांवर असून येथे नेहमीच मोठी वर्दळ असते. अशात एखादी घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीशेवाळा मुख्य रस्त्यावरील वीज केबिनमध्ये अशाप्रकारे तारा सोडण्यात आल्या आहेत.जर काही अनर्थ घटना घडल्यास याला जबाबदार कोण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

शेवाळा येथे वीज केबिनमुळे नागरिकांना, धोका...             
Previous Post Next Post