रावेर येथील गट नंबर 729/1 मध्ये अनाधिकृत फलक हटविण्याच्या मागणीसाठी २४ मार्चपासून उपोषण! (रावेर(शेख शरीफ)रावेर शहरातील गट नंबर 729/1 येथील इमाम अहमद रजा कॉलनीच्या वतीने २४ मार्च २०२६ रोजी नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण होणार आहे. अॅडव्होकेट जमील शेख यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या उपोषणात अनाधिकृत फलक काढण्याची मागणी केली जात आहे.जमील शेख यांनी दिलेल्या अर्जात स्पष्ट केले आहे की, गट नंबर 729/1 मध्ये सन १९९९ मध्ये नगरपालिका वतीने मंजूरी दिलेल्या ठरावानुसार इमाम अहमद रजा कॉलनीमध्ये सर्व पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, संबंधित गटात अनाधिकृत फलक लावले गेले आहेत, ज्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.तक्रार दिल्यानंतरही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे, जमील शेख यांनी २४ मार्चपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे रावेर शहरातील एक महत्त्वपूर्ण प्रशासनिक व सामाजिक मुद्दा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0