दिल्लीतील विद्यार्थी लाठीमारच्या निषेधार्थ हिंगणघाटात वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा*आज दिनांक,23/7/2026 ला दुपारी 11, वाजता

*दिल्लीतील विद्यार्थी लाठीमारच्या निषेधार्थ हिंगणघाटात वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा*

आज दिनांक,23/7/2026  ला दुपारी 11, वाजता 

मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

हिंगणघाट, 23 जुलै :दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी हिंगणघाट येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध मार्गांवरून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांना निवेदन सादर करण्यात आले.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा तसेच अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला.

यासोबतच NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान झाले असून, या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली.

या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विजय तामगाडगे यांच्यासह कुणाल वासेकर, अजय डांगरे, ललित धनविज, मयूर धाबर्डे, सुनील तेलतुंबडे, बाळा भाले, उद्धव धाबर्डे, उमेश भगत, अनिल मून, प्रा. अनिल बाभळे, महिपाल रामटेके, गोरख भगत, राजकपूर नगराळे, रसपाल शेद्रे, प्रवीण वाणे, संदीप पाटील, सुरेश गायकवाड, मंगला कांबळे आणि प्रमोदिनी नगराळे, सुरेखा मेश्राम यांनी केले.

मोर्चाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीही पाठिंबा दिला. विदर्भ विकास आघाडीचे अध्यक्ष अनिल जवादे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, सुनील डोगरे, अमोल बोरकर, बाळू वानखेडे, नूर शेख, विनोद वानखेडे, उमेश नेवारे, राजेश धोटे, हिमांशू गावंडे, हुकेश ढोकपांडे, पत्रकार चेतन वाघमारे, जगदीश वांदीले, काँग्रेसचे शेख सरफू आणि सुरेंद्र बोरकर यांच्यासह अनेक नागरिकांनी मोर्चात सहभागी होत आंदोलनाला समर्थन दिले.

निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनामार्फत केंद्र सरकारकडे पोहोचविण्याची विनंती केली.

Previous Post Next Post