जो चुकला नियमाला तो मुकला जीवनाला..शालेय विद्यार्थींची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व ऑटो रिक्षा यांची साठी एक दिवसीय परिवहन समिती अंतर्गत कार्यशाळा संपन्न..

जो चुकला नियमाला तो मुकला जीवनाला
शालेय विद्यार्थींची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व ऑटो रिक्षा यांची साठी एक दिवसीय परिवहन समिती अंतर्गत कार्यशाळा संपन्न 

(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मीडीया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )

दि.18/7/26 रोजी न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट वर्धा येथे वाहतूक विषयावर कार्यशाळा घेण्यात आली स्कूल व्हॅन किंवा बस यामध्ये आपत्कालीन दरवाजे अग्निशामक यंत्र प्रथमोपचार पेटी विद्यार्थींना रोड क्रॉस करतेवेळी मदतनीसही रोड क्रॉस करून घेणे 
तसेच ऑटो रिक्षामध्ये समोर विद्यार्थ्यांना बसू नये क्षमतेपेक्षा बसू नये अनाधिकृत वाहन वापर करू नये प्रत्येक वाहन चालकांना पोलीस व्हेरिफिक्शन बाबत माहिती तसेच म्युझिकचा वापर व अतिवेगाने वाहन चालू नये 
स्कूल बस आणि ऑटो रिक्षा यांनी वाहतूक नियम व सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे वाहतूक नियंत्रण शाखा चे स. फौ. रियाज खान यांनी शाळेतील बस ऑटो रिक्षाचे चालक मालकांना मार्गदर्शन केले
तसेच अमली पदार्थ म्हणजे अशी रासायनिक द्रव्य ज्याच्या सेवनाने 
मानवी मेंदूचे स्थिती बदलतात शारीरिक आणि मानसिक आजार व प्राणघातक ठरू शकते या व्यसनामुळे आर्थिक नुकसान आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते 
नको अमली पदार्थची नशा आयुष्याची होईल दूरदशा 
याबाबतची माहिती देऊन अवगत करण्यात आले 
सुरक्षा संबंधाने कॉल फ्री नंबर 112 पोलीस  सेवा 108 रुग्णवाहिक सेवा 1098 चाइल्ड हेल्पलाइन व महिला सुरक्षा कॉल बाबत माहिती देण्यात आली
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शन अंतर्गत पोलिस निरीक्षक विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांचे आदेशाने कार्यशाळा घेण्यात आली 
शाळेतील प्राचार्य गावंडे मॅडम तसेच खत्री सर शाळेतील ऑटो रिक्षा व बस चालक-मालक यांची उपस्थिती होती
Previous Post Next Post