रामेश्वर तांडा गावठाण प्रश्नावर गोर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन; ३ ऑगस्टला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
(प्रतिनिधी : किशोर चव्हाण
मीडीया पोलीस टाईम जळगाव तालुका विभागीय संपादक)
जळगाव, दि. १४ जुलै २०२६ : मौजे रामेश्वर तांडा, ता. पाचोरा, जि. जळगाव येथील शिवारातील शासकीय जमीन गट क्र. ६९-अ ही संत सेवालाल महाराज बंजारा लबाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत तांड्यासाठी गावठाण म्हणून तातडीने घोषित करण्यात यावी तसेच म्हसास ग्रामपंचायतीकडून होत असल्याचा आरोप करण्यात आलेला बेकायदेशीर राजकीय हस्तक्षेप व अतिक्रमण त्वरित थांबविण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
हे निवेदन गोर सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अर्जुन जाधव यांच्या नेतृत्वाखाली दि. १४ जुलै २०२६ रोजी सादर करण्यात आले. निवेदनामध्ये संबंधित शासकीय जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, तसेच तांड्यातील नागरिकांना गावठाणाचा कायदेशीर दर्जा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तांड्यातील नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
निवेदन देताना उपस्थित होते
गोर सेना संघटना चे जळगाव जिल्हाध्यक्ष अर्जुन जाधव
तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण
सर्जुन चव्हाण
निलेश राठोड चेतन जाधव
संतोष चव्हाण गणेश राठोड

