सोनम वांगचुक यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन.
महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर
भद्रावती दि. 20:- सोनम वांगचुक यांनी पर्यावरण संरक्षण, लद्दाखचा विकास व सर्वसामान्य नागरीकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शांततेच्या मार्गाने आवाज ऊठविला आहे.त्याचप्रमाणे नीट आणी टिईटीच्या कथीत पेपर फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहणतीवर पाणी पेरल्या गेले असुन त्यांचा परीक्षा व्यवस्थापणावरील विश्वास उडालेला आहे.त्यामुळे वांगचुक यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे व कथीत पेपर फुटीच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व या घटनेची नैतीक जबाबदारी स्विकारुन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधीकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. जनतेच्या प्रश्नांना आवाज फोडणाऱ्या सोनम वांगचुक यांनी वेगवेगळ्या समस्यांबाबत काही मागण्या शासनापुढे ठेवलेल्या आहेत या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या पुर्ण कराव्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महत्वाच्या परीक्षेचे पेपर फुटणे या घटनाही वरचेवर होत आहे. त्यामुळे प्रामाणीक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडालेला आहे. याची गंभीर दखल घेऊन यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व भविष्यात अश्या घटना होणार नाही याची काळजी घ्यावी व पेपरफुटीच्या प्रकरणात नैतीक जबाबदारी स्विकारुन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणिही सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार भद्रावती नगरपरिषद चे नगरसेवक फायज शेख, शहर जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके,विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष परभ गिरडकर,युवक जिल्हा उपाअध्यक्ष दीक्ष पारनंदी प्रदेश, शुभम बगडे, अमोल बडगे, बिपीन देवगडे, रोहित साखरकर, राकेश किनेकर, प्रमोद वावरे, प्रशांत, प्रवीण सिंग,
,प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, माजी गटनेते संजय वैद्य आदिवासी सेल शहर अध्यक्ष जाणार्धन गेडाम, शरद मानकर उपाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष सूरज चव्हाण कामगार शहर अध्यक्ष माहेश,अरविंद परचाके अनुप बेले अनिल मन्ने _________आदी उपस्थित होते

