भुसावळचा वर्ग एक असलेला अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील २ दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडला गेला.

भुसावळचा वर्ग एक असलेला अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील २ दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडला गेला.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल )

यावल दि.२२ जुलै 
भुसावळ येथील महावितरण वीज कंपनी कार्यालयातील वर्ग एक असलेला अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील वय ४९ हा  २ हजार रुपयाची लाच  घेताना 
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने भुसावळ शहर पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण भुसावळ विभागातील वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

याबाबत पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे सोलर सिस्टीम बसवण्याची एजन्सी असुन त्याअंतर्गत त्यांच्याकडुन भुसावळ शहरातील दोन ग्राहकांनी सोलर सिस्टीम खरेदी केल्याने त्यांचे तर्फे तक्रारदार यांनी महावितरण कंपनीकडे ऑनलाईन पध्दतीने सोलर सिस्टीम बसविण्याची मंजुरी व रिलीज ऑर्डर मिळणेकामी अर्ज सादर केले होते.सदरची प्रकरणे तपासुन त्यांना रिलीज ऑर्डर देण्याचे काम हे लोकसेवक नितीन अभिमन्यु पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग १),भुसावळ शहर १ महावितरण कार्यालय,भुसावळ यांच्याकडे होते.नमुद
प्रकरणामध्ये मंजुरी व रिलीज ऑर्डर न मिळाल्याने आज बुधवार दि.२२ जुलै २०२६ रोजी तक्रारदार हे आलोसे यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता, लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे प्रत्येक प्रकरणाकरीता १,०००/- रूपये प्रमाणे २ प्रकरणांचे २,०००/- रूपयांची लाचेची मागणी केली होती.सदर बाबत तक्रारदार यांनी ला.प्र.वि.जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज  दि. २२ जुलै २०२६ रोजी सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता लोकसेवक नितीन अभिमन्यु पाटील, पद- अतिरिक्त
कार्यकारी अभियंता (वर्ग १) यांनी तक्रारदार यांच्याकडे एकुण २ सोलर सिस्टीम बसविण्याची
परवानगी व रिलीज ऑर्डर देण्यासाठी २,०००/- रूपयांची मागणी करून ती स्विकारण्यास
पंचासमक्ष समंती दर्शवुन यशस्वी सापळा कारवाईदरम्यान लोकसेवक नितीन अभिमन्यु पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडुन २,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्याच्याविरूध्द भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.

सदरचा सापळा नाशिक परिक्षेत्र नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनासाठी अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली 
जळगाव येथील लाच् लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, नंदुरबार येथील पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे यांनी तसेच सापळा पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील,हे.कॉ.संगीता पवार, यांनी कार्यवाही केली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.

जळगाव येथील
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहान करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव येथे सपंर्क करावा.
Previous Post Next Post