महिला ची गैरसोय व समस्या निवारणासाठी आता मदत कक्ष नगरपंचायत मध्ये .. (अजीज खान शहर प्रतिनिधी यवतमाळ ढाणकी )राज्य सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलांना मिळावा, यासाठी ढाणकी नगरपंचायत ऍक्टिव्ह मोडवर आहे. या योजनेच्या लाभापासून कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये, यासाठी जुन्या नगरपंचायत मध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' यांचे फॉर्म भरणे चालू केले आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नसल्याने त्यांना अर्ज भरण्यासाठी बाहेर 100ते 200 रुपये खर्च करत आहेत. अर्ज भरण्यासाठी दुकान -दुकाने फिरत आहे.म्हणून आज नगरपंच्यात मध्ये अर्ज भरण्यासाठी कक्ष उगडला असून महिलांनी नगरपंचायत मध्ये येऊन मुफ्त अर्ज भरून या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान ढाणकी नगरपंचायत कर्मचारी प्रवेश माधवराव अढागळे,संजय तोताराम शेळके आणि उमेश अनंता करकले मंगेश वसंता गायकवाड यांनी केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0