ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघाला शहादा महाविद्यालयातील खेळाडूंच्या वतीने शुभेच्छा... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघास शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात क्रीडा ज्योत प्रज्वलित करून शुभेच्छा देण्यात आल्या. शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय संघास शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.के. पटेल होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या प्रा.के.के. पटेल, प्रा.डॉ.एस.डी. शिंदखेडकर , पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश, क्रीडासंचालक प्रा.डॉ. अरविंद कांबळे, क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. महेश जगताप, प्रा. व्ही.सी. डोळे, क्रीडा शिक्षक प्रा. जितेंद्र माळी, कार्यालयीन अधिक्षक सुनिल भांडारकर, प्रा.के.आर. निकुंभ, प्रा. यू.के. पावरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे खेळाडूंचा मेळावा भरत असतो. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येते की पदक जिंकण्याचा आलेख उंचावलेला दिसून येतो. पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघात एकूण 117 खेळाडूंची निवड झालेली आहे. त्यातील अनेक खेळाडूंनी याआधी देखील ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन पदक जिंकलेली दिसून येतात. ऑलिम्पिक स्पर्धेत भविष्यात आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी देखील सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांनी करून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी भारतीय संघास शुभेच्छा दिल्या.संघाचे मनोबल वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिक चिन्हांची रांगोळी काढून भारतीय संघास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .जितेंद्र माळी यांनी केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. अरविंद कांबळे यांनी केले. आभार प्रा.एम.डी. ठाकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अरविंद पाटील, प्रा. योगिता पाटील, प्रा. सुनिता पाटील, प्रा. शिवनाथ पटेल, प्रा.आर.एम. गावीत, प्रा.योगेश पटेल, प्रा. प्रियंका पटेल, दिलवर ठाकरे, संजय विसावे, श्रीकांत बोरसे, जयेश खर्डे, आशिष सोनवणे, खलिक शेख आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post