*प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी न थांबणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा जाहीर निषेध.... ( जळगाव जिल्हा उपसंपादक जितु इंगळे ) *प्रश्न न सोडविल्यास फेब्रुवारी मध्ये जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका बेमुदत काम बंद (संप ) आंदोलन करणार - रामकृष्ण बी.पाटील* जळगांव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना मा. संचालक,एनएचएम, मुंबई यांच्या आदेशानुसार जननी सुरक्षा योजनेच्या कामाचा सन 2023 पासूनचा थकीत मोबदला मिळावा. मा.आयुक्त, कुटुंब कल्याण तथा संचालक एनएचएम, आरोग्य भवन मुंबई यांच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालय असलेल्या आशा स्वयंसेविकांना आरोग्यवर्धिनीच्या कामाची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून सदर कामाचा मोबदला अदा करावा. वाघळी,तरवाडे,पातोंडा (चाळीसगाव), वरखेडी (पाचोरा) तसेच गिरड(भडगाव ) या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांच्या व्हाऊचरला जिओ टॅग फोटो प्रिंट जोडणे बंद करून कामाचा मोबदला अदा करावा. शासन नियमानुसार आशा सेविकांना कोणत्याही स्वरूपाच्या रजा लागू नाहीत.तरीही आशा सेविकांना बाहेरगावी जायचे असल्यास नियमबाह्य रजेचा अर्ज घेण्याची पद्धत बंद करावी. या जिल्हा स्तरीय प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करतील.अशी नोटीस दि.17 जानेवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देत चर्चा करून प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. परंतु सदर विनंतीकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले. म्हणून नाईलाजसत्व प्रजासत्ताक दिनी जिल्हाभरातील सुमारे तीनशेपेक्षा जास्त आशा सेविकांनी सकाळी दहा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत युनियनचे रामकृष्ण बी.पाटील आणि श्रीमती कल्पना भोई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन केले. परंतु कोणीही जबाबदार अधिकारी निवेदन स्विराकरण्यासाठी न थांबल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाचा युनियनतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आशा स्वयंसेविकांचे वरील प्रश्न जिल्हा परिषदेने येत्या पंधरा दिवसांत न सोडविल्यास जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका फेब्रुवारी महिन्यात बेमुदत काम बंद(संप) आंदोलन करतील आणि होणाऱ्या विपरीत परिणामास जिल्हा परिषद जबाबदार राहील असा इशारा रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे. सदर धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी श्रीमती कल्पना छाया महाजन .शर्मिला भालेराव . कविता चौधरी. कल्पना महाजन .मोनिका कुरकुरे . राजश्री वायके वाघोदा .भोई,सुनंदा पाटील, सुनंदा हडपे,वंदना पाटील,भारती नेमाडे,नम्रता पाटील,रविशा मोरे,उषा मोरे,भारती तायडे,आशा पोहेकर,भारती चौधरी,संगीता देवरे आदींनी प्रयत्न केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0