घराला आग लागलेल्या कुटुंबीयांना,सगरोळी परिवर्तन समितीची मदत. (मारोती एडकेवार जिल्हा :प्रतिनिधी नांदेड ) नांदेड :बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे दि 6 डिसेंबर दुपारी सगरोळी येथील मध्यभागी आसलेल्या, दाट लोकवस्तीतील शेतकऱ्यांच्या,कौलारू घराला विजेच्या शॉकसर्किटमुळे लागलेल्या,आगीत येथील शेतकरी कुटुंबातील हाणमंत दिगंबर सिद्धापुरे, बळवंत बाबाराव सिद्धापुरे, मारोती बापूराव सिद्धापूरे,रेणुकाबाई बालाजी सिद्धापुरे, यांच्या घरास आज दि. ६ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी बाराच्या सुमारास लागलेल्या, आगीत हाणमंत सिद्धापुरे, या शेतकऱ्यांने नुकतच सोयाबीन विकुन घरातील कपाटामध्ये, ठेवलेली रोकड व मौल्यवान दाग- दागिणे कपाटासह, जिवन आवशंक्य वस्तु जळुन खाक झाले. आगीमुळे उघड्यावर पडलेल्या या दुर्दैवी संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना फुलना फुलांची पाकळी म्हणून सगरोळी परिवर्तन समिती तर्फे सिध्दापुरे हणमंत दिगांबर कुटुंबीयांना भांडे व राशनचे किट देण्यत आले यावेळी खंडेराय,देशमुख,विश्वनाथ पा समन,शिवकुमार बाबने,शंकर महाजन, व्यंकटराव बामने, प्रभु मुत्तेपोड, सुनिल खिरप्पावर,राजु बामणे,शेख मुर्तुजा,पद्मवार संजय,कल्लोड सचीन,चुन्नमवार किशन, मारोती पाटील सिध्दापुरे,भगवान सिध्दापुरे,बाबु,आदिनाथ बाबने, चुन्नमवार,कृष्णा भंडारे,इरवंत खेळगे,आदी उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0