**नेताजी सुभाष* माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालया मध्ये विविध संगीतमय कवायतीचा सराव.. (मानवत / अनिल चव्हाण.)————————————मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालया मध्ये संगीतमय विविध कवायतीचे शालेय मुलांना धडे.येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये २३ जानेवारी ते २६ जानेवारी निमित्त विद्यालयामध्ये सांस्कृतीक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमा बरोबर संगीतमय कवायत व सराव वर्गाचे आयोजन करण्यात आले असून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. संजयजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाले आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मा.श्री. अशोकजी बैस सर व क्रिडा विभागप्रमूख मा.श्री. माणिकराव सिसोदे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. तर विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख मा.श्री. सदाशिवराव होगे पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयातील प्रांगणावर विविध संगीतमय कवायत सराव वर्ग सूरू असून या सराव वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असल्यामूळे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

नेताजी सुभाष* माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालया मध्ये विविध संगीतमय कवायतीचा सराव..                       
Previous Post Next Post