शेतकऱ्यांचा एकच ध्यास, शेतकरी विकास. दिनांक 12 /9 / 2025 ला कृषी अधिकारी जामनेर, व तहसीलदार साहेब जामनेर ,या दोघे अधिकाऱ्यांना व्यापारी कडून शेतकऱ्यांचे कशा प्रकारे शोषण होत आहे ,हे समजावून सांगितले, ते पुढील प्रकारे, सर्वात अगोदर ज्यावेळेस केळी पीक परिपक्व होतात, त्यावेळेस त्या केळी पिकाला काढण्यासाठी व्यापारी वर्ग वेळेवरती येत नाही, त्यामुळे शेतकरी घाबरतो त्यानंतर पंधरा-वीस दिवसांनी व्यापारी परत शेतकऱ्यांकडे येतात, आणि मग त्या घाबरलेल्या शेतकऱ्यांकडून कमी भावाने केळीची खरेदी करतात ,अशा प्रकारे शेतकऱ्यांना व्यापारी वर्ग फसवत आहे, ही तक्रार अर्ज आम्ही कृषी अधिकारी यांना दिला, व त्यावर ती चर्चा केली, तर कृषी अधिकारी यांनी आम्हाला असे सांगितले की , जरी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा केळी ला कमी भावाने जरी खरेदी केली तरी आम्ही, व्यापाऱ्यांविरोधात कारवाई करू शकत नाही, म्हणजेच शेतकऱ्यांचे शोषण जरी होत असेल, तरी मी व्यापाऱ्यां विरोधात कार्यवाही करू शकत नाही ,कारण हा सर्व अधिकार कलेक्टर साहेब यांना आहे, त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना अर्ज केला, कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही सर्व सांगितले की व्यापारी शेतकऱ्यांचे कशाप्रकारे शोषण करीत आहेत, त्यावरती कलेक्टर साहेबांनी आम्हाला उडवा उडवी चे उत्तर देत सांगितले ,की मी व्यापाऱ्यांवरती कारवाई करू शकत नाही, तशी कायद्यामध्ये तरतूद नाही, यावरून असे समजते की व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी ,व आमदार, खासदार ,यांची या व्यापाऱ्यांमध्ये भागीदारी अथवा कमिशन असेल, हे वरील विषयावरून लक्षात येते, यावरून शासकीय अधिकारी व नेते यांची सातगाट असेल हे नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, मला हे म्हणायचे आहे, भारत देश हा कृषिप्रधान देश आहे ,आणि या भारत देशात जर शेतकऱ्यांना शासन प्रशासन फसवत असेल तर, मी असे म्हणेल की,भारत देश स्वातंत्र्य झाला ही असेल ,परंतु भारतातील शेतकऱ्याला मात्र स्वातंत्र्य मिळालेले नाही, कारण शासन प्रशासन व्यापाऱ्यांची पाठ राखण करताना दिसून येत आहे, त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन ,या भ्रष्ट शासन व प्रशासन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी , त्यांच्यासाठी जन आंदोलन उभे करावे ,तरच आपल्याला आपल्या शेतीच्या मालाला योग्य तो भाव मिळेल ,कारण हे सर्व अधिकारी काम चुकारपणा करीत आहे ,किंवा त्यांनी व्यापाऱ्यांकडून कमिशन अथवा त्यांची त्या व्यापाऱ्यांमध्ये भागीदारी आहे, यासाठी आपल्याला शासन प्रशासना विरोधात आंदोलन उभे करावे लागेल ,त्यामध्ये आपल्या मागण्या पुढील प्रमाणे राहतील ,जो व्यापारी शेतकऱ्याला फसवेल त्या व्यापाऱ्यावरती 420 कलम लावून त्याला सहा महिने जामीन सुद्धा द्यायचा नाही ,प्रत्येक तालुका ,जिल्हा व राज्यांमध्ये जो व्यापारी मागील 10 वर्षात ज्या क्षेत्रामध्ये विभागात त्याने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला आहे , त्या क्षेत्रांमध्ये विभागांमध्ये त्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांचा पक्का माल खरेदी करावाच लागेल , खरेदी नाही केल्यास त्या व्यापाऱ्यावरती कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, जर त्या व्यापाऱ्यावरती कृषी अधिकारी किंवा कलेक्टर यांनी कार्यवाही नाही केल्यास ,तर मात्र कृषी अधिकारी व कलेक्टर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा ,तरच शेतकऱ्यांचे शोषण थांबेल शेतकऱ्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी, कानूनी नितीगत पद्धतीने, आपल्याला शासन व प्रशासन यांना लढा द्यावा लागेल, त्यासाठी बंधूंनो, मातांनो आणि भगिनींनो व माझ्या बाल मित्रांनो ,या शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये तुम्ही सामील झालात म्हणजेच तुम्ही या युगाचे क्रांतिकारी आहात , या शेतकऱ्यांच्या जीवनाला लागलेलं शासकीय व प्रशासकीय भ्रष्ट ग्रहणाला तुम्हीच तुमच्या क्रांतीच्या विचारसरणीने दूर कराल, कारण महापुरुषांनी सुद्धा सांगितले आहे की असा कुठलाही काळ येणार नाही त्या काळामध्ये सर्वच कामे चांगली होतील, यावरून असे लक्षात येते की काळ कुठलाही असो, शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकारांसाठी लढावे लागेल ,यासाठी तुम्ही तुमच कंबर आजच कसून घ्या , कारण आपला एकच ध्यास शेतकऱ्याचा विकास, आणि आपला ध्यास पूर्ण करायचा असेल तर आपल्याला या सिस्टम सोबत लढावं लागेल, त्यासाठी आपल्याला मोठा लढा द्यावा लागेल, तरच शेतकऱ्यांचा एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास हे सूत्र सिद्ध होईल, लोक तांत्रिक भारत देशातील पीडित शेतकरीअंबादास संतोष जाधव राहणार मांडवे बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव मो 9767022719
byMEDIA POLICE TIME
-
0