परळी नगरपालिकेच्या मुख्यधिकार्याच्या नाकर्तेपणामुळे परळी शहरात अनेक ठिकाणी निकृष्ट व बोगस दर्जाची कामे. बालासाहेब जगतकर. (परळी बीड जिल्हा प्रतिनिधी:-) परळी नगरपालिकेच्या मुख्यधिकार्याच्या नाकर्तेपणामुळे परळी शहरात निकृष्ट व बोगस दर्जाची कामे होत असल्याची चर्चा येथील नागरिकातून होताना दिसत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी नगरपालिकेचे नवीन आलेले मुख्याधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे व ढिसाळ नियोजनामुळे परळी शहरांना त्रास सहन करावा लागत असून याचा चेक भाग म्हणून प्रबुद्ध नगर येथील अनेक नागरिकांनी नळ जोडण्यास घेऊनही त्यांना भर पावसाळ्यात त्यांच्या नळाला पाणी येत नाही तसेच भीम नगर येथील महिलांचे सार्वजनिक स्वच्छालय याची डाग डीजे करून व थातूरमातूर काम करून कलर देऊन पूर्ण केल्याचे दाखवले असून ते आज घडीला एकदम घाण व अस्वच्छ असल्याचे महिला कडून सांगण्यात येत आहे तर बंगला गल्ली येथे नुकतीच डॉक्टर झाकीर हुसेन शाळेसमोर नगरपालिके अंतर्गत रोडचे काम चालू असून त्यामध्ये फक्त मुरूम व गोटे टाकून काम करण्यात येत आहे तर भीम नगर जगतकर गल्ली येथील गेल्या सहा महिन्यापासून निवेदन मोर्चे व प्रत्यक्ष भेटूनही पाईपलाईन करण्यात आलेली नाही पाणीपुरवठ्यासाठी करोडो रुपये येऊनही साधी 200 मीटर पाईपलाईन करण्यात न आल्यामुळे येथील नागरिकांना पाण्याचे हाल होत आहेत अशा प्रकारे परळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचे डोळेझाकपणा असून प्रशासक असूनही मी ह्याला बोलतो मी त्याला बोलतो असे उत्तरे देतात अशा प्रकारे यांच्या ढिसाळ नियोजनामुळे परळी शहरात निकृष्ट दर्जाची व कागदपत्री काम होत असल्याची चर्चाही येथील नागरिकांत होताना दिसत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे
byMEDIA POLICE TIME
-
0