दानशुर व्यक्तींनी सामाजिक कार्य कर्त्यांचे हात बळकट करावे-मुंजाभाऊ भिसे. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) हुतात्मा बहिर्जी शिंदे स्मृती दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप. सेलू : समाजातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणा साठी मदतीची गरज असते सामाजिक कार्यकर्ते ती मदत त्यांच्या पर्यंत पोहच वण्यासाठी प्रयत्न करतात त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांचे हात बळकट करावे असे आवाहन मुंजाभाऊ भिसे यांनी केले. दि.19 जुलै शुक्रवार रोजी कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या स्मृतिदिना निमित्त कै.दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतुन सुरू असले ल्या हात मदतीचा या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प प्रसाद महाराज काष्टे, मनिष बोरगावकर, संस्था सचिव चंद्रप्रकाश सांगतानी डाॅ,आशिष डख, डाॅ,अशोकराव नाईकनवरे,डाॅ,शिवाजीराव शिंदे, संयोजक सुनिल गायकवाड, प्रल्हादराव कान्हेकर, बंडू नाना कदम, शुकाचार्य शिंदे, पि.के. शिंदे, विष्णू बागल, मुख्याध्यापक डी. डी.शिंदे,बि.आर साखरे उपस्थित होते. प्रास्ता विक मुख्य मार्गदर्शक सुनील गायकवाड यांनी केले, कै.दत्तात्रय हेलसकर यांना स्मरून व हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या प्रतीमेस अभि वादन करून हात मदतीचा उपक्रम राबविण्यात शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व व मित्रपरिवार यांच्या सहकार्यातून हा उपक्रम चालतो असे विचार व्यक्त केले. आत्तापर्यंत शहरातील 2337 विद्यार्थ्यांपर्यंत हात मदतीच्या माध्य मातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. या प्रसंगी ह भ प प्रसाद महाराज काष्टे, शुकाचार्य शिंदे, डाॅ.शिवाजीराव शिंदे,मनिष बोरगाव कर, आदिनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचलण सुभाष मोहकरे,व विजय हिरे तर आभार ए,जी, पाईकराव यांनी मानले कार्यक्रमाच्या यशश्विते साठी संतोष चारठाण कर,भरत रोडगे,संदिप जुमडे, रोहिदास चव्हाण, सिमा उंडे, आनंद देवधर श्रीमती मुळे,बालासाहेब टरपले, विजय अंभुरे यांनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0