पूज्य साने गुरूजी महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा येथील पूज्य साने गुरुजी प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 25वा 'कारगिल विजय दिवस' हा साजरा करण्यात आला. कारगिल युद्ध सन 1999च्या मे महिन्यात सुरू होऊन दि. 26 जुलै 1999ला विजयी सांगता झाली होती. या युद्धात भारताने पराकोटीचा संयम बाळगत पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्यात यश मिळवले होते. दुर्दैवाने या युद्धात 1971 मध्ये झालेल्या युद्धापेक्षा जास्त हानी भारतीय सैनिकाची झाली. पाकिस्तानी सैन्य हे 5000 मीटरपेक्षा अधिक उंचीवर असल्यामुळे त्यांना याचा जास्त फायदा मिळत होता. तरी भारतीय सैनिकांनी मोठे शौर्य गाजवत गेलेला भूभाग परत मिळवला. त्या स्मृतिप्रीत्यर्थ कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव दिन साजरा करण्यात आला. यानिमीत्त युवकांमध्ये देश भावना जागृत करून देशाप्रती समर्पित होण्यास प्रोत्साहन दिले जाते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.एस.डी. शिंदखेडकर होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ .एम.के.पटेल होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून एनसीसी व इतर महाविद्यालयीन युवकांना देशाप्रती समर्पणाची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.सुभाष भालेराव यांनी केले. या कार्यक्रमास तांत्रिक सहाय्य डॉ.एस.एस. गवई, डॉ. मिलिंद पाटील, श्री.वळवी आणि श्री.बागले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एलसीपीएल मयूर साळी यांनी केले. कॅडेट प्रमोद सोनार यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा .मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना वाढवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक व स्वागत केले आहे.

Previous Post Next Post