अवैध रित्या वाळू वाहतूक करणारा ट्रक झाला पलटी. सगरोळी वाळू डेपोतून अवैध रीत्या वाळू वाहतूक. मारोती एडकेवार सर्कल प्रतिनिधी सगरोळी सगरोळी : सगरोळी डेपोतून अवैध रित्या वाळू .वाहतूक करणारा ट्रक हा जास्त वरलोड वाळू भरल्यामुळे सगरोळी वाळू डेपोच्या 500 मीटर अंतरावर ट्रक चा,पलटी झालाआहे.काही दुःखदहाणी झालेली नाही,ड्रायव्हर सर्व सुरक्षित आहेत. पण याकडे शासनाने लक्ष देतील का असा सवाल नागरिक करत आहेत.महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या वाळू डेपोतून,प्रत्येक गोरगरीब घरकुल लाभधारकांना सहाशे रुपये ब्रास वाळू. ही शासनाने उपलब्ध करून देण्यासाठी वाळू डेपो चा हा ठेका तेलंगणातील,अनेक मोठ्या लोकांनी घेतल्यामुळे नदीपात्रातून भरमसाठ वाळूचा मोठमोठा साठा या ठिकाणी जमा करून.ठेवलेला आहे अवैधरीत्या संध्याकाळी, व रात्रीच्या,वेळी ट्रक भरून दिली जात आहे.तरी अवैद्य धंदा जोमात आणि प्रशासन मात्र कोमात असा प्रश्न सगरोळी सर्कल मध्ये व सगरोळी, अंतर्गत होत चाललेला आहे याकडे महसूल विभाग लक्ष देतील का असा संताप जनक सवाल हा नागरिक करत आहेत.ट्रक पलटी झाल्यामुळे एक तास सर्व ट्राफिक ठप्प झाली होती.

Previous Post Next Post