वारंवार ई केवायसी मुळे शेतकरी त्रस्त , अद्याप शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच? (अजीज खान शहर प्रतिनिधी यवतमाळ ढाणकी) अनेक वेळा ई केवायसी करून सुद्धा अनुदानापासून शेतकरी वंचितच आहे. ई के वाय सी करने म्हणजे जणू शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच मन्हावी लागेल. गेल्या वर्षी पावसाने धुमाकाळ घालत शेतकऱ्यांचे बेहाल केले. तोंडी आलेला घास हिरावून गेला, शेतकरी शासनातर्फे काहीतरी अनुदान मिळेल काहीतरी तुटपुंजी मदत मिळेल या भाबड्या आशेवर अवलंबून होता. परंतु एकदा नाहीतर तीन तीन वेळेस ई केवायसी करून सुद्धा अनेक शेतकरी अनुदानापासून वंचितच आहेत.त्यामुळे ई-केवायसी‘ने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर अनुदानाच्या यादीत भरमसाठ चुका असल्याने ‘नको ते अनुदान अन नको ते अर्थसाहाय्य असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बँका तसेच सी-एससी सेंटरचे उंबरठे झिजविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.शेतातील काम धंदे सोडून शेतकरी ई के वाय सी करण्यासाठी वारंवार सी एस सी चे सेंटर चे उंबरठे झिजवत आहेत.70 , 80 वर्षाचे अनेक वृद्ध ई के वाय सी साठी येरझारा करत आहेत. त्यातच कधी साईटचा प्रॉब्लेम असतो तर कधी वृद्धांचे थम येत नाही यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. तरी तात्काळ, संबंधित विभागाने शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही यासाठी उपयोजना करण्यात याव्या असे शेतकऱ्यांच्या वतीने बोलले जात आहे. अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळी,पुर पिढी चा निधी अद्याप मिळाला नसून अडचणीत असलेल्या शेतकर्यांच्या पदरात आता तरी,निधी पडेल का? याकडे शेतकऱ्यांची लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post