वैशाखखेडे ग्रामस्थांच्या वतीने कुकडी माईचे जलपूजन आणि निसर्गपुजन .. ( सुदर्शन मंडले जिल्हा प्रतिनिधी जुन्नर पुणे) पिंपळवंडी( ता.जुन्नर) वैशाखखेडे ग्रामस्थांच्या वतीने निसर्गपुजन व कुकडी माईच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीने कुकडी नदी पात्राचे जलपूजन आणि ओटी भरून सर्वांच्या हस्ते पुजा करण्यात आली.या निमित्ताने पुरी गुळवणी आणि कांद्याची चटणी असा पारंपारिक वनभोजनाचा कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करण्यात आला. त्यावेळी वाड्या व वस्त्यांमधील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला

Previous Post Next Post