*व्हाईस ऑफ मिडीयाचा निवेदन कार्यक्रम शंभर टक्के (यशस्वी-बागडी*जालना)- मागील अनेक वर्षांपासून या स्थानिक वर्तमानपत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते. त्यामुळेच साप्ताहिकांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने आज गुरुवारी राज्यभरात संस्थापक अध्यक्ष संदिप काळे व प्रदेश अध्यक्ष विनोद बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले आहे. तसेच जालना जिल्ह्यात पण आज रोजी निवेदन देण्यात आले असून यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती होती, अशी माहिती व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकासकुमार बागडी यांनी दिली.यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकार्यांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणेच साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे, साप्ताहिक वृत्तपत्राची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा, साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी, अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी, रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना शंभर टक्के सवलत सुरू करावी, पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफतमध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी, आर एन आय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, जिल्ह्यातील सर्वसाधारण पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे व कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, इच्छूक व गरजवंत पत्रकारांना हमखास शस्त्र परवाना देण्यात यावा, सर्वसाधारण पत्रकारांच्या पाल्यांना प्राथमिक आणि उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे, जालना जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढली असून पत्रकारांच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेण्यात यावी, ज्या ज्येष्ट पत्रकारांना तात्काळ पेन्शन सुरु करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकासकुमार बागडी, जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे, मराठवाडा अध्यक्ष राजेश भालेराव, जालना शहराध्यक्ष रवि दानम, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कोलते, उर्दु विंगचे लियाकत अली खान, महेश जोशी, कृष्णा पठाडे, गणेश काबरा, दिनेश नंद, सुयोग खर्डेकर, धनंजय देशमुख, कन्हैय्या मितवा रामरख्या, कैलास वाघमारे, अमित कुलकर्णी, ईशाद शेख, अजिम खान, अशपाक पटेल, विनोद काळे, इलियास लखारा, देवचंद सावरे, कैलास फुलारी, अमेर खान, नाजिम मनियार, अंकुश गायकवाड, श्रीकिशन झंवर, सिताराम तुपे, बालाजी अडीयाल, शब्बीर पठाण, सुनिल खरात, नरेश श्रीपत, बालाजी एकदेय, देविदास निर्मळ, शेख महेजबिन आदींसह जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता मंडळींनी आपले समर्थन दिले.
byMEDIA POLICE TIME
-
0