*सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक खेळी मेळीच्या च्या वातावरणात संपन्न; नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.* (सावदा प्रतिनिधी युनुस तडवी ) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या सावदा शहर शाखेच्या वतीने रावेर तालुकाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी,२९ जून रोजी सावदा येथील विश्रामगृहात रावेर तालुका पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवीन सभासदांचा समावेश, संघटना बांधणी, पत्रकारांचे हित आणि समाजहितासाठी कार्यक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच, संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे ठराव घेण्यात आले.बैठकीदरम्यान, रावेर येथील ज्येष्ठ पत्रकार ईश्वर महाजन यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या निधनाबद्दल संघटनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल उपस्थितांनी आदरांजली वाहिली.नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. जिल्हा सचिव इकबाल पिंजारी यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी राजेश चौधरी (दैनिक दिव्य मराठी, खानदेश दर्पण) यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तालुका सचिवपदी सद्दाम पिंजारी यांची निवड झाली. तसेच सावदा शहर अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी (दैनिक लोकशाही, सामना) आणि सावदा शहर उपाध्यक्षपदी अजहर खान (सायं दैनिक एकता, बुलंद पोलीस टापोलीस टाइम्स) यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खानदेश विभागीय कार्याध्यक्ष संतोष नवले , जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाअध्यक्ष योगेश सैतवाल, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष सुमित पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष रवींद्र महाजन,जिल्हा सचिव राजेश बाबुराव चौधरी, सावदा शहराध्यक्ष प्रदीप शरद कुलकर्णी, सावदा शहर उपाध्यक्ष अजहर खान, यांच्या सह इकबाल गंभीर पिंजारी (दैनिक लोकशाही), सरदार इकबाल पिंजारी (दैनिक लोकमत), मसूद खान (लेखणी शस्त्र), प्रमोद कोंडे (महाराष्ट्र सारथी), आशिष चौधरी (महाराष्ट्र सारथी), प्रभाकर महाजन (दैनिक लोकशाही), पुरुषोत्तम संघपाळ (महाराष्ट्र सारथी), आनंद भालेराव (दैनिक देशदूत), शेख फरिश (दैनिक जळगाव वृत्त, मराठा दर्शन), युसुफ शहा (दैनिक साईमत), सरजू होले (दैनिक देशदूत), सचिन सकळकडे (खानदेश दर्पण), किशोर परदेशी (खानदेश दर्पण), संजीव चौधरी (दैनिक लोकमत), संतोष बारी (दैनिक लोकमत), संतोष राठोड (निमाड की धडकन), प्रशांत सरोदे (झुंजार न्यूज), कैलास लवंगडे (दैनिक पुण्य नगरी), आणि महेंद्र पाटील (पुण्य प्रताप) दस्तगीर खाटीक (दैनिक सकाळ) यांनी उपस्थिती नोंदवली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये ८ ते १० नवीन सभासद जोडण्याचे नियोजन होते, परंतु वैयक्तिक कारणांमुळे काही सभासद उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची नोंदणी पुढील बैठकीत पूर्ण करण्याचे ठरले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पत्रकारांच्या हिताबरोबरच समाजहितासाठी उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे. या बैठकीने पत्रकार संघटनेला नवीन दिशा आणि ऊर्जा मिळाली असून, स्थानिक पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0