बौद्ध अनुयायांनी त्रिशरण पंचशील पठण करीत गुरु पौर्णिमा साजरी केली.. .(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा शहरातील संभाजीनगर येथील बोधिवृक्ष परिसर प्रशिक बुद्ध विहारात गुरुपौर्णिमा निमित्ताने जगद्गुरु विश्व शांतीचे मार्गदाता विश्ववंदनी महामानव गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करून बौद्ध अनुयायांनी त्रिशरण पंचशील पठण करून गुरुपौर्णिमा साजरी केली. याप्रसंगी बौद्धाचार्य दिलीप पानपाटील व प्राध्यापक संजय निकम यांनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांचे उपदेश सांगून श्रीशरण, पंचशील, मंगल अष्ट गाथा, विधायक पंचशीलाचे पठण बौद्ध उपसकांकडून वधून घेतले. यावेळी शहरातील जुन्या व नवीन वसाहतील बौद्ध उपासक भगवान बिरारी, अरविंद कुवर, संभाजी इंदवे, भरत लोंढे, ज्ञानदेव बिऱ्हाडे, विष्णु जोधळे, गिरधर बिरारे, रविभाऊ मोरे, रविद्र आगळे, रतिलाल सामुद्रे, रघुनाथ बडसाणे, बापू घोडराज, प्रशिक मंडळाचे अध्यक्ष सुनिल शिरसाठ, सचिव प्रशिक मंडळाचे प्रदीप निकुंभ, गोटुभाऊ महिरे, दिपक मोहिते, नरेंद्र महिरे, दिपक आगळे, मिलिंद शिरसाठ, ॲड. आनंदा निकम, नरेंद्र कुवर, प्रा. मानव उपगडे, देविदास बिरारे, भिमा बिरारे, प्रा. राजेंद्र निकम, गोतम आगळे, सुरेश बिऱ्हाडे, वैभव बागुल, अलका जोधळे, विजया पाटोळे, उष्षा कुवर आदींसह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post