सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी (.कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार)नंदुरबार:तळोदा येथील सावित्रीबाई फुले प्रणित श्री.सुपडू वना माळी प्राथमिक विद्यामंदिरात सन्माननीय प्राचार्य प्रा.श्री.अमरदीपदादा अरुणकुमार महाजन सर यांच्या मार्गदर्शनाने गुरूपौर्णिमेनिमित्त चिमुकल्यांचा भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती वंदना माळी मॅडम यांनी भूषविले.सर्वप्रथम संस्थापक अध्यक्ष आदरणीय गो.हू.महाजन बाबाजी, माईसाहेब व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपापल्या वर्गशिक्षकांना गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांना अभिवादन केले. भाषणात भाग घेतलेल्या सर्व १७ विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून पेन वाटप करण्यात आले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रशांत सूर्यवंशी सर यांनी तर आभार श्री.नगराळे सरांनी केले तसेच श्रीमती सोनाली माळी मॅडम ,श्रीमती चंद्रकलाबाई यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post