लाडकी बहिण योजना अक्राणी तालुक्यातील दुर्गम भागात नेटवर्क ची समस्या.. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )तालुक्यातील बिलगांव येथे बीएसएनएलची मोबाइलचा टावर उभाकरुन चार महिने झाले अद्याप चालू केले नाही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फार्म भरण्यासाठी नेटवर्कच्या शोधात सातपुड्यात अतिदुर्गम भागात बिलगांव,बोरी, चिखली, सावऱ्यादिगर, माळ, गेंदा,खर्डी, भमाणा यांसह अनेक गावांना नेटवर्क समस्या आहे महिलांना व स्थानिक प्रशासन अंगणवाडी सेविका यांना अडचणी समोर जावे लागत आहे युद्ध पातळीवर प्रशासन कडून पात्र लाभार्थी महिलांचे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत प्रशासनाच्या या प्रयत्नांला तांत्रिक फटका बसत आहे त्यावर मात करून विहित मुदतीत अर्ज भरुन घेणे प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले बीएसएनएल टावर लवकरात लवकर चालू करावे असे ग्राहकांचे म्हणणे आहे

Previous Post Next Post