युवाशक्ती सामाजिक मित्र मंडळ यांच्या आयोजनाने ढाणकी ते माहूरगड पदयात्रा... (अजीज खान शहर प्रतिनिधी यवतमाळ ढाणकी ) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु मध्ये ब्रह्म, विष्णू, महेश , आहे. गुरु साक्षात परब्रम्ह गुरु मध्य देवा दी देव गुरुमध्ये साक्षात परब्रम्ह आहे असे सांगितले जाते. त्या प्रमाणे युवा शक्ती सामाजिक मित्र मंडळ ढाणकी यांच्या वतीने ढाणकी ते माहूर पदयात्रा दरवर्षी काढली जाते.आज ११ वर्ष ही परंपरा कायम टिकून आहे. दि २१/७/२०२४सोमवार ला गुरुौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिर आखर (इंदिरा गांधी चौक )दत्त मंदिर येते महा आरतीचे आयोजन करण्यात आले .व आरती झाल्यानंतर दत्ताची पालखी घेऊन गावातून शोभायात्रा काढण्यात आली.शोभा यात्रेत गावातील आनंद दत्त भजनी मंडळ तसेच पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला भजनी मंडळ व गावातील भक्त मंडळी यांनी भजन करीत टाळ मृदंगाच्या गजरात आनंद नामाने ढाणकी नगरी दुमदुमुन निघाली. दिंडीत भाविकांची पखवाज,टाळ, व आनंदनामाच्या गजरात दत्त नामाच्या जयघोषात तलीन होऊन पावली,फुगडी, खेळत शोभायात्रा काढण्यात आली. गावातून शोभायात्रा झाल्यानंतर लगेच दिंडीचे प्रस्थान माहूर दत्त शिखर देवस्थान कडे निघाले. यात ढाणकी येथील प्रतिष्ठित नागरिक दिंडीला सोबत पाठवण्यासाठी हजर होते. माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील,आनंदराव चंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, प्रवीण पाटील मिराशे, रमण रावते, रामराव गायकवाड, शेषराव नरवाडे पत्रकार दिगांबर शिरडकर , प्रदीप मिटकरे, वसंत फुल्लकोंडवार, तसेच युवाशक्ती सामाजिक मित्र मंडळ सदस्य निरंजन नलगे,साई आरकीलवाड,रमेश चिंचोलकर,मिनेश येरावार, जालिंदर सुरमवाड आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post