*अतीवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील पिकांचे नुकसान शेतकरी हवालदिल* (दिपक केसराळीकर तालुका प्रतिनिधी बिलोली )जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील खरीप हंगामातील मूग, उडीद,सोयाबीन,कापूस, तूर एकदल व द्विदल धान्यपिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील मौजे पाळा येथील शेतकरी अनिल खंडेराव कांबळे यांना दोन एकर कोरडवाहू शेती आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या कामापासून ते बी-बियाणे रासायनिक खते व निंदन,खुरपणी फवारणी आदी कामाचा खर्च दोन एकर शेतीचा लागवडीचा खर्च 25000 झाला आहे. उत्पन्न किती होईल माहित नाही. पण अतिवृष्टीमुळे जमीन हलक्या दर्जाचे असल्याने तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तर सोयाबीनही पिवळा पडला आहे. वरतून अस्मानी संकट असताना जंगली प्राणी पिकांची नुकसान करीत आहेत.त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष द्यावे व वन्य प्राण्यांचा उपद्रवी हरणाच्या कळपाचा बंदोबस्त करावा.व वन विभागाकडून नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून करतोय असे हवालदिल शेतकरी अनिल कांबळे यानी दैनिक अधिकरनामा बिलोली तालुका प्रतिनिधी दिपक केसराळीकर यांच्याशी थेट बांधावर बोलताना म्हटले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0