लोकमान्य विद्यालयात टिळक पुण्यतिथी साजरी.. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती चंद्रपूर) भद्रावती,दि.४:-येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख वक्ते म्हणून चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राध्यापक श्याम हेडावू होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे संचालक तथा माजी प्राचार्य अविनाश पाम्पट्टीवार आणि प्राचार्य सचिन सरपटवार मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. श्याम हेडावू यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून व लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रा.श्याम हेडावू यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत टिळकांचा आदर्श जपण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच प्रमुख अतिथी उल्हास भास्करवार यांनीही याप्रसंगी लोकमान्यांवर प्रकाश टाकला.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी अध्यक्षीय भाषणातून टिळकांचे चरित्र विविध पुस्तकातून वाचण्याचेआवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवनावर आधारित एक लघू नाटिका सादर केली. तसेच त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारा पोवाडाही सादर केला. कार्यक्रमादरम्यान पालक - शिक्षक संघाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष शंकर पिदुरकर आणि सहसचिव महेशकुमार निमसरकर यांचा चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सचिन सरपटवार यांनी केले. संचालन प्रा.प्रणिता शेंडे यांनी केले. तर आभार आशुतोष सुरावार यांनी मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0