दसनूरचे प्राचीन उमेश्वर महादेव मंदिर श्रावण सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन (रावेर तालुका प्रतिनिधी ) : तालुक्यातील दसनूर येथे सुकी नदीकाठावर प्राचीन उमेश्वर महादेवाचे मंदीर आहे.श्रावणी सोमवारनिमित्त या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात फुलांची आरास आणि रोषणाई करण्यात आलेली आहे. सुमारे आठशे वर्षापूर्वीचे हे प्राचीन मंदिर असल्याचा इतिहास असूनया मंदिराबाबत पुरातन अख्यायिकाही सांगितले जाते. पूर्वी त्या ठिकाणी उकिरडा होता. एका भक्ताला तेथे साक्षात्कार झाल्याचे समजते, ती जागा साफ करीत असतांना त्यातून स्वयंभू पिंड निघाली. पिंडाला फावडे लागले व पाणी व रक्ताच्या धारा निघाल्या होत्या.तसेच ही पिंड येथून खोदून गावात स्थापित करण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. पिंड खोदली असता जमिनीखालचे पाणी लागले पण पिंडीचा अंत लागला नाही. ही पिंड जमिनीतून निघाली आहे, तसेच ही पिंड जामिनीत थोड्या अंतराने अष्टपैलू आहे.त्याच ठिकाणी नंतर मंदिराची उभारणी झाली..हे प्राचीन मंदिर अष्टपैलू बांधले आहे. तसेच पूर्वी हे बांधकाम मातीचे व दगडांचे होते.आज त्याला बाहयरूप नवीन दिले आहे, आता हे मंदिराचे सर्व कामकाज ट्रस्टच्या देखरेखीत केले जात आहे.तसेच २०० वर्षापासून सकाळ,संध्याकाळ या वेळेस महादेवाची नित्यनियमाने आरती व पुजापाठ होत असते.मंदिराच्या आजुबाजुला विठ्ठल मंदिर व मारोती मंदिर आहे.श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे फराळ प्रसाद वाटपाचा व तिसऱ्या सोमवारी भजन, अभंग,गायन कार्यक्रम हे नित्यनियमाने सुरू आहेत उद्या पहिल्या श्रावण सोमवारी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.तापी नदी वरून कावड आणून भव्य शोभा यात्रा निघेल. भक्तगण कावडीने पाणी आणून महादेव पिंडीवर अर्पण करणार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी परिसरातील भाविक हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करीत असतात. क वर्ग तीर्थक्षेत्रदसनूर गावातील उमेश्वर महादेव मंदिराला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राची मान्यता मिळाली आहे. भक्तांसाठी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे.३०वर्षापासून मंदिरात भागवत सप्ताह,भजन,कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह तसेच सकाळी व संध्याकाळी पंचपात्री कार्यक्रम होतो.
byMEDIA POLICE TIME
-
0