अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा चक्कर येऊन मृत्यू.प्रकल्प अधिकाऱ्यांने घेतली तात्काळ दखल. (यावल दि.५ ( सुरेश पाटील विभागीय संपादक ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अनुदानित आश्रम शाळेतील एका विद्यार्थ्याला आज सकाळी चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण आदिवासी विभागात मोठी खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळता बरोबर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे. मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेमधील इयत्ता ३ री तील विद्यार्थी फुलसिंग बारेला वय ९ याला आज सोमवार दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी अचानक चक्कर येऊन खाली पडून निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली संपूर्ण आदिवासी विभागासह शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असली तरी याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी तातडीने दखल घेऊन पुढील कारवाई सुरू केली. याबाबत सविस्तर माहिती घेतली असता त्या विद्यार्थ्याला चक्कर कशामुळे आले हे पुढील तपासणीत निष्पन्न होणार आहे.त्याला कोणता आजार होता किंवा नाही..? याची तपासणी वैद्यकीय पथक मार्फत केली जाणार असून शव विच्छेदन केल्यानंतर नेमका काय प्रकार आहे तो समजून येईल अशी माहिती सुद्धा प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दिली. नेमके काय झाले आताच आपण काहीही सांगू शकत नाही.आणि यापुढे आश्रम शाळेत अशी कोणतीही घटना घडणार नाही याबाबत दक्षता बाळगली जाईल तालुक्याचे आरोग्य अधिकारी तपासणी पथक त्या ठिकाणी पाठविले आहे,आणि ते शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करत आहे.अशी दुर्दैवी घटना पुन्हा कुठे होऊ नये म्हणून सर्व शाळेचे मुख्याध्यापक अध्यक्ष आणि संबंधित अनुदानित आश्रम शाळेचे अध्यक्ष वगैरे यांची सर्व सर्वांची बैठक पण तातडीने घेतली आणि त्यातून असा प्रकार पुन्हा कोणत्याही अनुदानित किंवा शासकीय आश्रम शाळेमध्ये होऊ नये याची शंभर टक्के दक्षता घेतली जाणार आहे.त्या विद्यार्थ्याला यापूर्वी काही आजार होते किंवा नाही याची सुद्धा चौकशी केली जाईल. शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांकडे काही दुर्लक्ष झाले आहे किंवा नाही तसेचशाळेकडून दिरंगाई झाली असल्यास संबंधितांच्या विरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल.मयत विद्यार्थ्यांच्या पालकांस नियमानुसार आर्थिक मदत देण्याची कारवाई सुरू केली.
byMEDIA POLICE TIME
-
0