अहो जिल्हाधिकारी साहेब यावल रावेर तालुक्यात शेतकऱ्यांना लुटणारी टोळी कार्यरत आहे त्यांच्यावर कारवाई करा... यावल दि.५ ( सुरेश पाटील विभागीय संपादक ) गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे रावेर तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते त्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले परंतु यावल रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती उत्पादित माल खरेदी करताना काही ठराविक यंत्रणें कडून दरात आणि मापात पाप करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे आधी त्यांच्यावर कारवाई करा कारण काल रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४ च्या रात्री एक केळीने भरलेले वाहन वेगवेगळ्या दोन टोल काट्यावर वजन माप केले असता ८० किलो वजनाचा स्पष्ट फरक एका तरुण शेतकऱ्याला आढळून आला परंतु रात्रीची वेळ असल्याने तो तरुण शेतकरी केळीच्या वाहनासोबत नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई करता आली नसली तरी त्या वेगवेगळ्या २ टोल काट्यांच्या पावती वरून तोल काट्यांमध्ये ऍडजेस्टमेंट कशी करून ठेवलेली आहे हे प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्याला समजून आले आहे, तरी जिल्हाधिकारी साहेब आपली शासकीय गोपनीय संबंधित यंत्रणा यावल रावेर तालुक्यात अचानक कोणालाही समजू न देता कामाला लावून शेती उत्पादित मालाची खरेदी करताना मापात आणि भावात पाप कसे केले जात आहे आणि शेतकऱ्यांना कसे लुटले जात आहे हे उघड झाल्याशिवाय राहणार नाही अशी यावल रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.

Previous Post Next Post