संत सावता माळी युवा मंच तर्फे आज रविवारी ता. ४ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात २१८ दात्यांनी रक्तदान करुन सदर शिबिर यशस्वी केले. हे या रक्तदान शिबिराचे सलग नऊवे वर्ष आहे. ( कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार) नंदुरबार: श्री.संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून येथील श्री. संत सावता माळी युवा मंच यांच्या वतीने येथील संत सावता माळी भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात माळी समाज बांधवांबरोबरच ईतर समाज बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. शिबिरात यावेळी अनेक पती-पत्नीचा जोडप्यांनी तसेच दोन दिव्यांग नागरिकांनी देखील रक्तदान केले. रक्त संकलित करण्यासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँकचे डॉ. सुनील चौधरी, रक्तपेढी तंत्रज्ञ दिलीप जाधव, कैलास पाटील, पांडुरंग गवळी, चंद्रकांत दंडगव्हाण, गजानन चौधरी, शिवम गवळी तसेच नंदुरबार येथील जन कल्याण ब्लड बँकचे डॉ. राजेश केसवाणी, आकाश जैन, खलील काजी, शेखर पाटील, तेजस पाटील, गोरख भिल, संदीप वळवी, मनीषा पावरा आदींनी परिश्रम घेतले. सदर रक्तदान शिबिराला आमदार राजेश पाडवी यांनी भेट देवून पाच हजार रुपयांची देणगी दिली.सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी माळी समाज बांधवांनी विशेषतः युवकांनी तसेच माळी समाज पंच मंडळ, माळी समाज महिला मंडळ, श्री. संत सावता माळी युवा मंचच्या सर्व युवकांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post