सावळदा भजनी मंडळातर्फे व्यसनमुक्ती आणि सामाजिक प्रबोधनपर जनजागृती... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा तालुक्यातील सावळदा येथील संत तुकाराम भजनी मंडळातर्फे व्यसनमुक्ती, सामाजिक प्रबोधन व लोक जागृतीपर भजने, कवने, लळीत सादर करून करमणुकीतून प्रबोधन केले जाते. त्यांच्या या कार्यामुळे पंचक्रोशीत संत तुकाराम भजनी मंडळाने नावलौकिक मिळवला आहे. संत तुकाराम भजनी मंडळ गावा-गावात जावून व्यसनापासून आपल्या जीवनावर व त्यापासून उध्वस्त झालेल्या कुटुंबावर भजन सादर करून जनजागृती करतात. ज्या-ज्या गावात हे भजनी मंडळ भजनाचे कार्यक्रम सादर करतात त्या-त्या गावातील ग्रामस्थांमध्ये एक आगळा वेगळा ठसा उमटवीत आहेत. तसेच भारूडच्या माध्यमातून देखील व्यसनापासून मुक्ती कशी मिळेल याविषयी माहिती देण्यात येते. तसेच शासनाच्या लोकोपयोगी उपक्रमांचे सदरचे भजनी मंडळ प्रचार आणि प्रसार करते. संत तुकाराम भजनी मंडळ संपूर्ण जिल्हाभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवित असते. त्यातून या मंडळाने परिसरात नावलौकिक मिळवला आहे. या संत तुकाराम भजनी मंडळात अध्यक्ष म्हणून राजेंद्र सरदारसिंग गिरासे, उपाध्यक्ष नंदुसिंग भगवानसिंग जमादार, सदस्य भोजेसिंग सुरतसिंग गिरासे, नामदेव गुलाबसिंग गिरासे, दगा बाबुराव पाटील, संजय चंद्रसिंग पाटील, रमेश मंगा पाटील, युवराज रामसिंग गिरासे आदी कार्यरत आहेत.

Previous Post Next Post