श्रमजीवी संघटनेच्या वतीने सार्वजनिक वांधकाम विभागाचा उपहासात्मक सत्कारखड्ड्यामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेचा नारळ फोडून उप अभियंता यांनी केला शुभारंभ .. (वाडा:पालघर जिल्हा विभागीय संपादक) वाडा भिवंडी मनोर हा महामार्ग खड्डेमय झाल्याने अनेकदा आंदोलने, मोर्चे, रस्तारोको करूनही महामार्ग दुरुस्त झाला नसल्याने श्रमजीवी संघटनेमार्फत शेकडो कार्यकर्ते नेहरोली येथे जमून सार्वजनिक बांधकाम विभागाचा व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता चव्हाण यांचा उपहासात्मक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व खड्डेमय रस्त्याचे फोटो भेट म्हणून देण्यात आले. तसेच नेहरोली येथील वाडा भिवंडी महामार्गांवर खड्डे करून पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग राबवित असल्याने खड्डा करून पाणी आडवा व जिरवा मोहिमेचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, उपाध्यक्ष लक्ष्मण सवर, पालघर जिल्हा सरचिटणीस किशोर मढवी, तालुका अध्यक्ष जानू मोहनकर, भरत जाधव, तालुका सचिव सुरज दळवी, बाळाराम पाडोसा, आदेश वाघ, राजू जाधव, रेखा पऱ्हाड, मिलिंद थुळे, सरिता जाधव, कल्पेश जाधव, दिलीप चौधरी व शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post