अक्राणी तालुक्यातील सर्व खड्डेमय रस्ते तात्काळ दुरुस्ती करणे या संदर्भात बिरसा फायटर्स कडून तहसिलदार अक्राणी यांना निवेदन, ( उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी अक्राणी ) तालुका,अक्राणी- तालुक्यातील सर्वच रस्ते हे खड्डेमय झालेले असुन तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे यात नंदुरबार येथे जिल्ह्याच्या ठिकाणी कमी वेळात जाता येईल असा पर्यायी मार्ग म्हणजे धडगांव ते चांदसैली या मुख्य रस्त्यावरील बिजरी ते काकरपाटी दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे.सदर रस्ता हा धडगांव ते तळोदा या दोन तालुक्यांना जोडणारा व जिल्ह्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते. ठेकेदार व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत. हा रस्ता दुरुस्ती करण्याचे काम कंत्राटदारास देण्यात आले आहे. परंतु गेल्या 3 वर्षांपासून रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून गरोदर महिला , वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत.वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांच्या अपघात होत असुन दुखापत होत आहे. दुर्गम भागातील या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.या रस्त्यावरून प्रवास करतांना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो म्हणून तातडीने हा रस्ता व अक्राणी तालुक्यातील सर्वच रस्ते हे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे असे निवेदन तहसिलदार अक्राणी यांना निवेदन देण्यात आले आहे.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

