भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम; भद्रावतीत 'श्री सद्गुरू पादुका दर्शन व पूजन सोहळा' संपन्न..!*(*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; गरजूंना मदतीचा हात*)

*भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम; भद्रावतीत 'श्री सद्गुरू पादुका दर्शन व पूजन सोहळा' संपन्न..!*

(*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; गरजूंना मदतीचा हात*)


महेश निमसटकर 
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 



भद्रावती दि.24:- भक्ती, शक्ती आणि सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून 'स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने आयोजित श्री सद्गुरू पादुका दर्शन व पूजन सोहळा' २३ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमयी वातावरणात संपन्न झाला. 

सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री सदगुरू पादुका दर्शन व पुजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.यामुळे पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी या ऐतिहासिक सोहळ्याला चिमूर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार बंटीभाऊ (कीर्तीकुमार) भांगडिया, वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांनी सपत्नीक उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी  राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, अतुलजी देशकर माजी आमदार, संजय धोटे माजी आमदार, अशोकभाऊ जिवातोडे, राहुलबाबू पुगलीया,  सुदर्शनजी निमकर, राजेंद्रजी वैद्य, विनोदभाऊ दत्तात्रय, सुभाषकाका गौर, ऍड. पुरुषोत्तम सातपुते, चंद्रकांतभाऊ वासाडे, चंद्रकांतजी गुंडावार, रघुवीर अहिर, नगराध्यक्ष प्रफुलजी चटकी, वरोरा नगराध्यक्ष अर्चनाताई आशिष ठाकरे, अवेशजी पठाण (मानद सचिव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर), गणेशजी तर्वेकर (नगरसेवक व संचालक), रोहितजी बोम्मावार (संचालक), जयंत टेभुर्डे (उपसभापती व संचालक), श्री. गजानन पातोडे, डॉ. ललित मोटघरे (संचालक) सौ. नंदाताई अल्लुरवार (संचालक), विजयजी बावणे (संचालक), श्री नंदू भाऊ नागरकर, श्री. पांडुरंगजी जाधव, विशाखा शेळकी मुख्याधिकारी, नगर परिषद भद्रावती, मा. राजेश भांडारकर – तहसीलदार, भद्रावती, पोलीस निरीक्षक भद्रावती श्री योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक चिमूर दिनेश लबाडे मधुकर काळे – नायब तहसीलदार, भद्रावती
लक्ष्मणरावजी गमे – माजी सर्वाधिकारी, गुरुकुंज मोझरी, बबनराव धानोरकर – विश्वस्त, श्री जगन्नाथ बाबा देवस्थान, भांदेवाडा, ॲड पुरुषोत्तम सातपूते , चंद्रकांत वासाडे , राजू डोंगे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती , अश्लेषा भोयर – उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती, गजानन उताणे – संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्व भक्त गणांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवून संतांच्या पादुकांचे पुजन केले.

---------------------
कोट

केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता, या सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित आणि गरजू घटकांना मदतीचा हात देऊन ट्रस्टने खऱ्या अर्थाने 'मानवता धर्म' जपला आहे.

अनेक वर्षांपासून अखंड परंपरेने कार्यरत असलेल्या या ट्रस्टच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत, गरजू व दुर्बल घटकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचे उदात्त कार्य पार पाडण्यात आले आहे.

ही सेवा, सहकार्य व समर्पणाची अखंड परंपरा समाजहितासाठी प्रेरणादायी ठरत असून, मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचा हा एक आदर्श उपक्रम मानला जात आहे.

 यामध्ये विदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन' कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत, अरविंद मारोती पाचभाई आणि राकेश मधुकर डमरे यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यात आले. तरुणांनी स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने दिलेली ही मदत त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण घेऊन आली आहे. आरोग्य क्षेत्रातील आव्हाने ओळखून श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियाना द्वारे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना तातडीची मदत करण्यात आली. यामध्ये पांडूरंग सिताराम भट, पंढरी दौलत क्षिरसागर, इंदिरा विठ्ठल झाडे यांना उपचारासाठी आर्थिक निधी सुपूर्द करण्यात आला. शिक्षणाप्रती आपली जबाबदारी पार पाडताना 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजने' तून शुभम भुक्या (बरांज तांडा) याला शैक्षणिक सहकार्य करण्यात आले. तसेच 'स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजने' द्वारे विनोद देठे, नवनिता बगडे आणि प्रतिभा आत्राम यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक भविष्याची जबाबदारी ट्रस्टने स्वीकारली आहे.

ट्रस्टने सामाजिक कर्तव्याची व्याप्ती वाढवत, नंदोरी (बु) येथील ग्रामस्थांना गावाच्या 'स्वागत गेट'साठी सहकार्य करण्यात आले. तसेच माजरी येथील शिवकुमार सेवडय्या यांच्या कुटुंबाला कठीण प्रसंगात सांत्वनपर मदत देऊन ट्रस्टने संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत आहोत, ही ग्वाही दिली.
हा केवळ मदतीचा सोहळा नसून, एक सक्षम आणि सुदृढ समाज घडवण्याच्या दिशेने टाकलेले छोटेसे पाऊल आहे. भद्रावती आणि वरोरा परिसरातील जनतेची सेवा करण्यासाठी आमचा ट्रस्ट सदैव कटिबद्ध राहील. असे आश्वासन ट्रस्टच्या वतीने देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रस्ट समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करत आहे. कालचा सोहळा हा भक्तीच्या आनंदासोबतच सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा एक प्रयत्न ठरला. भविष्यातही जनकल्याणाचे हे कार्य असेच निरंतर सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
Previous Post Next Post