*विद्यासागर हायस्कूलमध्ये* आठवणींचा अलंकारिक सोहळा संपन्न
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक { अनिल चव्हाण }
———————————
मानवत तालूक्यातील करंजी येथील विद्यासागर हायस्कूलच्या पवित्र प्रांगणात दिनांक २५ मे २०२६, शनिवार रोजी इयत्ता दहावी (२०११–१२) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जणू आठवणींच्या सुवर्णकळ्यांनी फुललेला एक अनुपम सोहळा ठरला. काळाच्या ओघात दूर गेलेली सखी-सोबती पुन्हा एकत्र येताच, शाळेच्या प्रत्येक विटेतून भूतकाळाच्या गोड सुरांची साद ऐकू येत होती.
या मंगल प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री केस वसेकर यांनी भूषविले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक विशेष दिमाख लाभला. प्रमुख आयोजक अशोक कांबळे, राजश्री सोनार आणि किरण कुमार जाधव यांच्या कुशल नियोजनाने हा स्नेहमेळावा यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचला. त्यांना भागवत मोरे, मार्तंड धावणे, महादेव निर्मळ, श्याम निर्मळ, अनंता माने, नारायण निर्मळ, रमेश निर्मळ, काशिनाथ ढगे, सतीश जाधव, महेश निर्मळ, दिगंबर जाधव आणि प्रज्वल ढगे यांची भक्कम साथ लाभली.
विद्यार्थ्यांमध्ये अशोक कांबळे, किरण कुमार जाधव, भागवत मोरे, मार्तंड धावणे, महादेव निर्मळ, श्याम निर्मळ, अनंता माने, नारायण निर्मळ, रमेश निर्मळ, काशिनाथ ढगे, सतीश जाधव, महेश निर्मळ, दिगंबर जाधव, प्रज्वल ढगे यांचा सक्रिय सहभाग लाभला, तर विद्यार्थिनींमध्ये सोनाली हातकडके, अलका जाधव, उमा ढगे, रेशमा ढगे, श्यामबाला साखरे, रेणुका जाधव, सोनाली जाधव, शितल डोंगरे, कुशीवर्ता निर्मळ, सुवर्णा मोगरे, सुशीला खापरे आणि अंजली निर्मळ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व सर्व शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपण करीत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांची यशस्वीता ऐकून सर्व शिक्षक भारावून गेले व प्रत्येकाने कृत्य-कृत्य झाल्याची भावना व्यक्त केली झाल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री वसेकर सर, श्री ज्ञानोबा इंगळे, लक्ष्मण वाघमारे, लक्ष्मण गाजुलवार आणि रेणुकादास मुळे यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींचे दरवाजे उघडले. त्यांच्या शब्दांमधून जणू काळाच्या पटावर उमटलेल्या आठवणी पुन्हा सजीव झाल्या.
यावेळी श्री मुरमुरे सर, श्री आसोलेकर सर आणि मारुती कदम यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला चार चांद लावणारी ठरली.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रज्वल ढगे यांनी केले. प्रत्येकाने मनोगत व्यक्त करत बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. हास्यकल्लोळ, भावनांचे तरंग आणि मैत्रीची उब यामुळे वातावरण भारावून गेले. विशेष म्हणजे, सर्वांनी मिळून ‘खो-खो’चा खेळ खेळत पुन्हा एकदा बालपणाचा आनंद अनुभवला—जणू वेळेची साखळी काही क्षणांसाठी थांबली होती.
या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचेही आयोजन केले होते. शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी एकत्र सहभोजन घेत, स्नेहबंध अधिक दृढ केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यासागर हायस्कूलचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री इंगळे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सोहळा सर्वांना प्रेरणादायी ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो मैत्रीच्या धाग्यांना नव्याने गुंफणारा, आठवणींच्या गंधाने भारलेला आणि आयुष्यभर स्मरणात राहील असा एक भव्य-दिव्य अनुभव ठरला.

